Sambhajinagar news  saam tv
Video

Sambhajinagar Water Crisis: उंदरानं पळवलं तोंडचं पाणी! संभाजीनगरचा पाणीपुरवठा ९ तास बंद|VIDEO

Rat Causes Major: एका उंदरामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे तब्बल 9 तास शहराचा पाणी पुरवठा बंद होता.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यावर पुन्हा एकदा अनपेक्षित संकट कोसळलं आहे. या वेळी एका उंदरामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा तब्बल ९ तास ठप्प होता. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये गुरुवारी पाणी मिळू शकले नाही. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले.

महत्वाचं म्हणजे, या तांत्रिक बिघाडाचा परिणाम शनिवारीही जाणवणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती, जेव्हा एका धामण सापाने डीपीमध्ये प्रवेश करून यंत्रणेत बिघाड केला होता आणि त्याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला होता.

वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून, पाणीपुरवठा यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT