Ramdas Athawale saam tv
Video

Ramdas Athawale: पाकिस्तानने तो भाग सोडावा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही- रामदास आठवले|VIDEO

India Should Wage War: केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले हे आज लोणावळा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान मोदींना युद्ध पुकारण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून दहशतवाद्यांना ठार मारावे अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या दहशतवादी हल्ल्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी युद्ध पुकारण्याची मागणी केली आहे.

जो पर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तो पर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत. यामुळे माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात जर देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात केली.

ते म्हणाले, पहलगामचा हल्ला निंदनीय आहे. त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात. त्यामुळे तो भारतात घेणे गरजेचे आहे. पाकिस्तानने तो भाग सोडावा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आमचे सरकार या विषयी गंभीर आहे. विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे असे मत मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT