Ramdas Athawale news Saam Tv
Video

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

Ramdas Athawale on Reservation Sub Classification : अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. आठवले यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Saam Tv

अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. 'उपवर्गीकरण करायला हरकत नाही', असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. त्यावेळी आरक्षणाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.

रामदास आठवले आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये येऊन रामदास आठवले यांनी कॉलर उडवत उदयनराजेंची स्टाईल मारली.

या भेटीदरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या काव्यशैलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत रामदास आठवले यांनी उदयनराजेंवर खास कविता सादर केली.'माझ्या बाजूला उभे आहेत उदयनराजे...आणि आमच्या दोघांचे चित्र आहे ताजे..., आठवले यांच्या या कवितेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AFG: शुभमन गिलसमोर अफगाण गोलंदाजानी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics: इकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, तिकडे मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंच्या आमदाराला 'प्रपोजल'; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; आता पुण्यात FDA ने टाकली धाड

SCROLL FOR NEXT