Ram Sutar  Saam Tv
Video

Ram Sutar: राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Bhushan Award: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत त्यांच्या नावाची घोषणा केली.

Priya More

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये ही घोषणा केली. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राम सुतार यांचा जन्म १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. राम सुतार यांनी २००हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवली आहेत. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांनी तयार केलेली शिल्पे आहेत. त्यांनी सर जे. जे आर्ट्स कॉलेजमध्ये शिल्पकलेमध्ये पदवी मिळवली. त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक देखील मिळाले आहे. त्यांनी भारतीय पुरातत्व खात्यात नोकरी केली.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातल्या १३ कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत राम सुतार यांचे अभिनंदन केले.

राम सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले काम त्यांनी केले. गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी', देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी तयार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT