Gade family from Wagholi offering a half-kilo silver rakhi to Sant Dnyaneshwar Maharaj  saamtv
Video

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

Silver Rakhi To Sant Dnyaneshwar Maharaj: वाघोलीतील वारकरी गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाची चांदीची राखी अर्पण केली आहे. संपत आबा गाडे यांचे कुटुंबीय तीन वर्षांपासून ज्ञानेश्वर माऊलींना राखी अर्पण करतात.

Bharat Jadhav

  • वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना अर्धा किलो चांदीची राखी अर्पण केली.

  • ही परंपरा तीन वर्षांपासून सुरू आहे.

  • वारकरी मंडळी माऊलींना बंधू स्वरूप मानतात.

  • रक्षाबंधनानिमित्त भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले.

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

बहिण-भावांचा अतिशय पवित्र अशा नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन. याच सणाच्या निमित्ताने वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाची चांदीची राखी अर्पण केली आहे. वारकरी मंडळी हे ज्ञानेश्वर माऊलींना आपला सर्वस्व मानत असतात, अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील गाडे ह्या वारकरी कुटुंबीय तीन वर्षांपासून दागिन्याची राखी अर्पण करतात. यावर्षी माऊलीच्या स्वर्ण कलशासाठी सोने दान करून माऊलींना अर्धा किलो पेक्षा जास्त वजनाची चांदीची राखी अर्पण केलीय. रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. तसेच यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी बांधवांना चांगलं उत्पन्न मिळून त्यांची सुख, शांती आणि समृध्दीने भरभरून प्रगती होऊ दे, अशी प्रार्थना गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊली चरणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मुंबईत शिंदे गटाला मोठा हादरा, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: नांदेड-लोहा माहामार्गावर कार पलटी होऊन दोघे जखमी

Chanakya Niti : तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाणक्यांचे हे विचार १००% ठरतील प्रेरणादायी

Shocking : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी कृत्यानंतर कौर्याची सीमाच ओलांडली, शहरात खळबळ

Rasmalai Chocolate Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर, झटपट तयार करा टेस्टी रसमलाई चॉकलेट

SCROLL FOR NEXT