VIDEO : आगामी काळात आणखी बऱ्याच मोठ्या घडामोडी घडणार, स्वाभिमानीच्या राजू शेट्टीचं मोठं वक्तव्य SAAM TV
Video

VIDEO : आगामी काळात आणखी बऱ्याच मोठ्या घडामोडी घडणार, स्वाभिमानीच्या राजू शेट्टीचं मोठं वक्तव्य

Raju Shetti On MVA And Mahayuti : 'महायुती आणि महाविकास आघाडी हे शेवटपर्यंत एकसंध राहतील असे मला वाटत नाही. आगामी काळात आणखी बऱ्याच मोठ्या घडामोडी घडणार आहेत असा दावा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापुरात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट भेट झाली, ही भेट राजकीय नव्हती असे मंत्री तानाजी सावंतांनी स्पष्ट केले, दरम्यान राजू शेट्टीनी याभेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अनेक दावे प्रतिदावे केले आहेत.

दरम्यान 'महायुती आणि महाविकास आघाडी हे शेवटपर्यंत एकसंध राहतील असे मला वाटत नाही', 'आगामी काळात आणखी बऱ्याच मोठ्या घडामोडी घडणार आहेत' असा दावा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. छोटे पक्ष आणि संघटना मिळून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटंल आहे. सोबतच त्यांनी सत्तेत जाण्याचा मोह आम्हाला केव्हाही नव्हता. आम्हाला केवळ व्यवस्था परिवर्तन करायचे आहे, असं म्हणत आपलं धोरण स्पष्ट केलंय.

राजू शेट्टींच्या या विधानानंतर राज्यात तिसरी आघाडी तयार होणार का? राजकारणात विधानसभेआधी किंवा नंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

SCROLL FOR NEXT