५० हजार कोटींच्या घोटाळ्यासाठी शक्तिपीठ महामार्ग; राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप saam tv
Video

Shaktipeeth Expressway : ५० हजार कोटींच्या घोटाळ्यासाठी शक्तिपीठ महामार्ग; राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप

Raju Shetti On Shaktipeeth Expressway : ५० हजार कोटींच्या घोटाळ्यासाठी राज्यात शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे, असा खळबळजनक दावा राजू शेट्टी यांनी केला आहे.

Nandkumar Joshi

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या महामार्गाबाबत आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. ५० हजार कोटींचा घोटाळा करण्यासाठी राज्यात शक्तिपीठ महामार्ग लादला जातोय. त्याचा भार सामान्य जनतेवर तब्बल ९० वर्षे राहणार आहे. त्यामुळे आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

परभणीत आज, गुरुवारी राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा या विषयांवर भाष्य केले. तसेच सातत्याने शेतकऱ्यांविरोधात बोलणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना केवळ समज देऊन नाही, तर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी शेट्टींनी केली.

अमेरिकेने जाहीर केलेल्या टॅरिफच्या निर्णयावर केंद्र सरकारने जर अमेरिकेसमोर पायघड्या घातल्या, तर भारतातील शेती व्यवसाय उद्ध्वस्त होईल. त्यामुळे त्यांच्याविरोधात केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, आम्हीही देशपातळीवरील सर्व लोकांना एकत्र करत असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT