Raj Thackeray addressing the Shetkari Kamgar Paksha rally in Panvel, strongly opposing land sales to outsiders and urging Maharashtrians to uphold their identity. Saam Tv
Video

Raj Thackeray: जमिनी विकू नका, महाराष्ट्र विकून मोठं होऊ नका – राज ठाकरेंचा मराठी जनतेला आवाहन|VIDEO

Raj Thackeray Statement On Land Selling In Konkan: शेतकरी कामगार पक्षाचा पनवेलमध्ये 78 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला,यावेळी राज ठाकरे हे देखील उपस्थित होते.

Omkar Sonawane

आपल्या रायगडमध्ये कोण येतेय, कोण राहातेय, माहिती नाहीत. उत्तरेमधील अनेकांनी कोकणात जमिनीच्या जमिनी घेतल्या आहेत. आमच्या लोकांना इतके कळत नाही, यातून आपणच संपणार आहोत. जमिनी घेण्यासाठी आले तर जमिनी विकायच्या नाहीत, त्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून येणार असल्याचे सांगा, असे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितले. पनवेलमधील शेकपाच्या मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. बाहेरच्या राज्यात आपल्याबद्दल लाजिरवाणे बालले जाते. मराठी माणसे विकत घेण्यासारखी आहेत, असं बोलले जातेय. मराठी माणसे विकली जातात. जर असे असेल तर छत्रपतींचे पुतळे कशासाठी ठेवायचे. त्यांनी काय शिकवले हे विसरलात का? ज्यावेळी स्वाभिमान शून्य माणसं उरतता तेव्हा फक्त जिवंत प्रेते उरतात, हे बाबासाहेब पुरंदरे यांचे वाक्य आहे. तुम्ही जिवंत प्रेतासारखं राहू नका. तुम्ही मोठं व्हा.. पण महाराष्ट्र विकून मोठं होऊ नका. जमिनी विकू नका, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

IND-W vs SA-W: 'हा विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देणारा', महिला संघाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

World Cup 2025: चक दे इंडिया! भारताच्या पोरींनी अखेर करून दाखवलंच; ICC वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच कोरलं नाव

Amanjot Kaur Direct Throw: वाह भाई वाह! अमनजोत कौरचं गजब क्षेत्ररक्षण; धाव चोरणाऱ्या खेळाडूच्या दांड्या केल्या गुल, Video Viral

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

SCROLL FOR NEXT