Raj Thackeray travels in Mumbai local train; huge crowd welcomes him at Churchgate for satyacha morcha Saam TV Marathi news
Video

Raj Thackeray Mumbai Local: राज ठाकरेंचा दादर-चर्चगेट प्रवास, मुंबईकरांसोबत मारल्या गप्पा

Raj Thackeray Travels by Local Train : मुंबईत आयोजित सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनी लोकलने प्रवास केला. दादर ते चर्चगेट प्रवासादरम्यान नागरिकांसोबत बसून संवाद साधला. चर्चगेटवर मनसैनिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray travels in Mumbai local train for Satyacha morcha : शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मुंबईत सत्याचा मोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे. या सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकलने निघाले आहेत. राज ठाकरे हे दादरमधून लोकलने चर्चगेटकडे गेले आहेत. अनेक वर्षानंतर राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केलाय. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत लोकलवारी केली. ते खिडकीच्या जवळच्या सीटवर बसले होते. सर्वसामान्य नागरिकांसोबत राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केला. चर्चगेट स्थानकावर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शेकडो मनसैनिक पोहचलेत. (Shiv Sena MNS NCP united protest in Mumbai)

मुंबईतील सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मनसैनिक मोठ्या संख्येने सीएसएमटी स्थानकाकडे येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईच्या चारकोप विधानसभा क्षेत्रातील मनसैनिकांकडून देखील यासाठी तयारी करण्यात आली असून शेकडो मनसैनिक ढोल ताशा वाजवत आता रेल्वेने सीएसएमटीकडे निघाले आहेत. विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन सत्याचा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah Upay For Marriage: तुळशी विवाहच्या दिवशी करा सोपे उपाय, विवाह जुळतील

Rava Laddu Recipe: संध्याकाळी जोरदार भूक लागलीय, मग घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी रवा लाडू

'लोकशाही टिकवण्यासाठी एक व्हावं लागेल'; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

धुळ्यात बनावट नोटांसह एक जेरबंद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

Til Ladoo: हिवाळ्यात खा तिळाचे लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT