MNS Chief Raj Thackeray addressing media on meat ban controversy, questioning government’s role in deciding citizens’ food choices. Saam Tv
Video

Raj Thackeray: कुणी काय खावं हे सरकारनं सांगू नये; मांसबंदीवर राज ठाकरेंचा हल्लाबोल|VIDEO

Raj Thackeray Opinion On Meat Ban: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांसबंदीवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार किंवा महापालिकेने कोण काय खावे हे ठरवू नये, असे ते म्हणाले.

Omkar Sonawane

राज ठाकरे यांनी मांसबंदीवर तीव्र टीका केली.

सरकार किंवा महापालिकेने आहाराविषयी निर्णय घेऊ नये, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खायचे स्वातंत्र्य नाकारणे हा स्वातंत्र्यदिनाशी विरोधाभासी आहे, असा त्यांचा दावा.

आमच्या लोकांना मी सांगितले आहे ते सगळे सुरू ठेवा. पहिली गोष्ट आपण पहिली पाहिजे की, महापालिकांना याचे अधिकार नाही. कोणी काय खावे आणि कोणी काय खाऊ नये, याचे निर्णय सरकार आणि महापालिकेने करू नयेत. एका बाजूने स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करायचा आणि खायचे स्वातंत्र्य नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी विचारला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारची बंदी आणत आहात, हाच विरोधाभास आहे. दोन दिवस आपण पाळतो एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दूसरा प्रजासत्ताक. प्रजेची सत्ता आणि स्वातंत्र्य. मग स्वातंत्र्य म्हटल्यावर तुम्ही बंदी कशी आणता. कोणाचे धर्म काय आहेत आणि कोणाचे काय सण आहेत, या प्रमाणे कुणी काय खावे, हे सरकारने सांगू नये. कोणत्याचा सरकारने सांगता कामा नये. असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Badam Benefits: रोज सकाळी ५ बदाम खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Bhakri Tips: तांदळाची मऊ, लुसलुशीत भाकरी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

SCROLL FOR NEXT