Raj Thackeray addressing media on the pigeon feeding ban issue in Mumbai, criticising government and minister Lodha. Saam Tv
Video

Raj Thackeray: आधी हिंदी, आता कबूतर आणले; लोढा कुठल्या समाजाचे मंत्री नाहीत; राज ठाकरे संतापले|VIDEO

Raj Thackeray Criticism On Pigeon Feeding: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबुतरखाना बंदी प्रकरणावर सरकार आणि जैन समाजावर टीका केली. लोढा मंत्री कुठल्या समाजाचे नाहीत, महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा मान राखावा, अशी मागणी त्यांनी केली.

Omkar Sonawane

राज ठाकरे यांनी कबुतरखाना बंदी प्रकरणावर सरकार आणि जैन समाजावर टीका केली.

लोढा हे कुठल्याही समाजाचे मंत्री नसल्याचे ठाकरेंचे विधान.

आंदोलनावेळी पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांना व पत्रकारांना मारहाण केली असल्याचा आरोप.

"आधी हिंदी आणली, आता कबुतर आणली" असा टोला धार्मिक प्रथांवर.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कबुतरखाना बंदी प्रकरणावर आज पत्रकार परिषदेत सरकार आणि जैन समाजाच्या भूमिकेवर रोखठोक टीका केली. हायकोर्टाने कबुतरांना खायला घालू नये असा स्पष्ट आदेश दिला आहे. कबुतरांमुळे कोणकोणते रोग पसरू शकतात, हे डॉक्टरांनी सांगितले आहे. तरीसुद्धा धर्माधर्माच्या नावाखाली तुम्ही खाऊ घालत असाल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. एकाने असे केले तर बाकीचेही तसेच करतील, मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशासाठी? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, या प्रकरणावर आंदोलन होत असताना पोलिसांनी त्वरित कारवाई करायला हवी होती, पण झाली नाही. त्यामुळे लोढासारखी माणसं मध्ये येतात. लोढा मंत्री आहेत, कुठल्या समाजाचे मंत्री नाहीत. त्यांनी महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा मान राखला पाहिजे.

काल झालेल्या घटनेत पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना अटक व मारहाण केल्याचा आरोप करताना ठाकरे म्हणाले, ज्यांनी चाकू-सुऱ्या आणल्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती. आधी हिंदी आणली, काही झाले नाही; आता कबुतर आणली. उद्या अजून कोणकोणते प्राणी आणणार, माहीत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT