Raj Thackeray Saam TV
Video

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित करण्यात आलेल्या मोर्चाच्या फक्त चर्चेनेच सरकारला माघार घ्यावी लागली, असा दावा करत राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्रिभाषा धोरणाविरोधात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित करण्यात आलेल्या मोर्चाच्या फक्त चर्चेनेच सरकारला माघार घ्यावी लागली, असा दावा करत राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.वरळी डोममध्ये आज पार पडलेल्या ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त विजयी मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले, आम्ही फक्त मोर्चाची घोषणा केली आणि चर्चा सुरू झाली, तिथेच सरकार गडबडली. शेवटी जनभावनेपुढे त्यांना नमते घ्यावे लागले.

राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं की, मराठी भाषा, मराठी विद्यार्थ्यांचे हक्क आणि महाराष्ट्राचा अभिमान अबाधित ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही सुरुवात आहे, आता पुढचा लढा अधिक व्यापक आणि परिणामकारक असेल. या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून, या एकतेमुळे सरकारसमोर नवे प्रश्न उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Shraddha Kapoor - Eetha Video : श्रद्धा कपूरच्या 'ईथा'चा अंगावर काटा आणणारा टीझर, कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?

Train weight distribution: अनेक टन वजन असलेल्या ट्रेन धावूनही रेल्वेचे रूळ तुटत कसे नाहीत?

Irregular meal timings: दररोज वेगवेगळ्या वेळेस जेवल्याने पोटावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची बाब

SCROLL FOR NEXT