संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना या कार्यक्रमातून उजाळा मिळाला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे किस्से आपण अनेकदा ऐकलेत.बाळासाहेब ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा एक धमाल किस्सा राज ठाकरेंनी सांगितलाय. खासदार संजय राऊत यांच्या नवीन ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशनावेळी राज ठाकरेंनी हा किस्सा सांगितलाय. संजय राऊत यांच्या सुरुवातीच्या काळातील आणि बाळासाहेबांसोबतच्या पहिल्या महत्त्वाच्या मुलाखतीचा हा किस्सा ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
खासदार संजय राऊत यांच्या नवीन ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरें बंधुंच्या उपस्थितीत झालं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात संजय राऊत आणि बाळासाहेबांचा किस्सा सांगितला. राऊत यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाचा मी सुरुवातीपासून साक्षीदार आहे, असे सांगत राज ठाकरेंनी 'लोकप्रभा' मासिकासाठी घेतलेल्या त्या ऐतिहासिक मुलाखतीचा किस्सा सांगितला. राज ठाकरे बोलताना म्हणाले की, संजय राऊतांनी अनेकदा माझ्या वडिलांच्या शिव्या खाल्ल्या आहेत.
इतकेच नाही तर बाळासाहेबांनाही सुरुवातीला संजय राऊत फारसे आवडत नव्हते. ते त्यांना मुलाखत द्यायलाही सहज तयार नव्हते. संजय राऊत यांना 'लोकप्रभा' या साप्ताहिकासाठी बाळासाहेब ठाकरेंची विशेष मुलाखत घ्यायची होती. सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंनी मुलाखतीला नकार दिला होता. परंतु नंतर ते तयार झाले. मुलाखत घेताना संजय राऊतांनी बाळासाहेबांना आडवे तिरपे प्रश्न केली. त्यावेळी मुलाखतीदरम्यान बाळासाहेबांनी संजय राऊतांना शिव्या हासडल्या, होत्या असं राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.