Raj Thackeray leaves Igatpuri after addressing MNS leaders on election preparedness and voter list analysis. Saam Tv
Video

Raj Thackeray: राज ठाकरे इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने रवाना, मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन|VIDEO

Raj Thackeray On Uddhav Thackeray Alliance Decision: मनसे शिबिरातील दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी नेत्यांना मार्गदर्शन केलं. मतदार याद्यांवर लक्ष देण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केलं

Omkar Sonawane

मनसेच्या इगतपुरी येथील दुसऱ्या दिवसाच्या शिबिरात आज सकाळचे सत्र संपन्न झाले. या सत्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आखण्यात आली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सकाळच्या सत्रात उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत निवडणुकीच्या तयारीला तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश दिले. राज यांनी स्पष्टपणे सांगितले की, उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ, तोपर्यंत निवडणूक तयारी थांबवू नका. त्यांनी मतदार याद्यांचे बारकाईने विश्लेषण करण्याचे, तसेच याद्यांमधील दुबार नावे शोधण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले. दुपारच्या सत्रात त्यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शिबिराच्या संध्याकाळच्या सत्राचे नेतृत्व मनसे नेते बाळा नांदगावकर करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT