Heavy police presence as MNS sets the stage for Raj Thackeray’s rally near Jodhpur Sweets, Mira-Bhayandar. Saam Tv
Video

Raj Thackeray In Mira-Bhayandar: राज ठाकरेंची तोफ राड्याच्या ठिकाणीच धडाडणार; मिरा भाईंदरच्या जोधपूर स्वीट्स परिसराला छावणीचे स्वरूप | VIDEO

Raj Thackeray Rally Near Jodhpur Sweets: मिरा-भाईंदरमध्ये जोधपूर स्वीट्सजवळ राज ठाकरे आज सभा घेणार आहेत. मराठी-अमराठी व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर ही सभा होत असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Omkar Sonawane

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज मिरा भाईंदरमध्ये धडाडणार आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेल्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेची मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. मिरा-भाईंदरमध्ये वाघ येतोय असा आशय असणारे पोस्टर जारी करण्यात आलंय.

मराठीच्या मुद्द्यावरुन मिरा-भाईंदरमध्ये मनसे विरुद्ध परप्रांतीय व्यापारी असा वाद पेटला होता होता. परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसे सैनिकांनी चोपल्यामुळे व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर झालेल्या या यशस्वी मोर्चानंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ज्या ठिकाणी हा वाद झाला होता त्या जोधपुर स्वीटसच्या काही अंतरावरच राज ठाकरे हे सभा घेणार आहेत. या ठिकाणाला आज संपूर्ण पोलिस बंदोबस्त असून छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात स्कूलबस गेली वाहून

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

SCROLL FOR NEXT