Raj Thackeray News SaamTv
Video

Raj Thackeray : मी आक्रोड ठेवलं होतं का? राज ठाकरेंनी केली चंद्रकांत पाटलांची नक्कल | VIDEO

Raj Thackeray Mimicry : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा आज मुंबईत झाला. यात राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची नक्कल करत भेटीचा किस्सा सांगितला.

Saam Tv

मी भाजपच्या लोकाना किंवा इतर पक्षाच्या राजकारण्यांना भेटू नये असं काही लोकांचं म्हणण आहे. राजकीय नेते पूरणी एकमेकांना सहज भेटू शकत होते. आता सगळ लपून छ्पुन सुरू असतं. पक्षाचा विरोध, पक्षाची धोरणं यात कधीही तडजोड होणार नाही. पण म्हणून वैर घेतल्यासारखं वागावं असं नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा मुंबईत झाला. त्यात ते बोलत होते. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या बैठकीचा एक गंमतीदार किस्सा राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितला. हा किस्सा सांगताना राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांची नक्कल केल्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी एकदा नाशिकच्या दौऱ्यावर होतो. समोरून चंद्रकांत पाटील आले. मुंबईत आलो की येतो चहा प्यायला, असं त्यांनी म्हटलं. अशी परिस्थिती तुमच्यावर आली तर तुम्ही काय कराल? त्यानंतर चंद्रकांत पाटील मला माझ्या घरी भेटण्यास आले. माझ्याशी चर्चा करून बाहेर पडले. त्यांना पत्रकारांनी विचारले काय झाले? तर आपण काय सांगू सहज चर्चा झाली. पण चंद्रकांत पाटील यांनी बाहेर पडल्यानंतर पत्रकारांपुढे काय केले असेल? असं विचारत राज ठाकरे यांनी उजवा हात वर करत आपल्या दंडाची बेटकुळी काढून दाखवली आणि चंद्रकांत पाटील यांची नक्कल केली. त्यामुळे एकच हास्यकल्लोळ झाला. यावर पुढे ठाकरे म्हणाले की, त्यांच्या या हावभावाचा अर्थ काय होता हे मला कळला नाही. त्यांनी मला कडेवर घेतलं होतं की त्याचा इतर काही अर्थ होता हेच मला अजून समजलेलं नाही. काय म्हणजे, मी इथे (कोपराजवळ) आक्रोड ठेवले होते आणि त्यांना ते फोडून दिले का? बर मी त्यांची ही कृती पाहिली नव्हती. त्यामुळे पत्रकारांनी येऊन मला त्यांची नक्कल करून दाखवत त्याचा अर्थ विचारला तर मीच त्यांना विचारतोय असं केलं म्हणजे काय झालं? असं म्हणत ठाकरेंनी हा किस्सा सांगितला.

दरम्यान, मी कोणालाही भेटलो तरी माझ्या मराठीचा बाणा हा कायम आहे. तो मी बोथट करत नाही. आपल्याला महाराष्ट्रासाठी इथल्या माणसांसाठी जे करायचं आहे, ते आपण करणारच आहोत. माझ्यासोबत राहायचं असेल तर ठाम रहा, खचलेल्या पिचलेल्या लोकांचं नेतृत्व मला करायचं नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds Benefits: चिया सीड्सचे पाणी पिऊन कंटाळा आलाय? ट्राय करा खाण्याचे ७ चविष्ट अन् हेल्दी पर्याय

Maharashtra News Live Update: वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचं कार्य केलं- देवेंद्र फडणवीस

Namo Shetkari Yojana : कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी' योजनेचा लाभ मिळणार नाही? 56 लाख शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

SCROLL FOR NEXT