Raj Thackeray speaks to CM Devendra Fadnavis over the eviction issue concerning Mumbai’s koli community at Sasoon Dock and Girgaon. Saam Tv
Video

Maharashtra Politics: राजकारणात खलबतं वाढली! राज ठाकरेंचा फडणवीसांना फोन, नेमकी चर्चा काय? पाहा,VIDEO

Raj Thackeray calls CM Fadnavis: ससून डॉक आणि गिरगाव येथील मच्छीमारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला.

Omkar Sonawane

मुंबई: येथील ससून डॉक आणि गिरगाव येथील मच्छीमार संघावर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून हस्तक्षेप केला. मुंबईतील कोळी बांधवांच्या तक्रारी लक्षात घेत राज ठाकरे यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली. ससून डॉक आणि गिरगाव मच्छीमार संघाच्या जागा रिकाम्या करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने तगादा लावला जात होता. त्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करत हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेमुळे हा पेच सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या मध्यस्थीमुळे कोळी बांधवांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

SCROLL FOR NEXT