Congress leaders debate alliance with Raj Thackeray’s MNS amid Mumbai municipal polls tensions. Saam Tv
Video

भाजपचा पराभव करण्यासाठी सोबत येऊ, पण मारहाणीची भाषा करणारे सोबत नको – राज ठाकरेंना सोबत घेण्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद|VIDEO

Congress Leaders Split Over Alliance with MNS: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मनसेसोबत आघाडी करण्याबाबत मतभेद उघड झाले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी याला समर्थन दिले असले तरी वर्षा गायकवाड यांनी तीव्र विरोध व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी मनसेसोबत आघाडी करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी याला तीव्र विरोध केला आहे. मारहाणीची भाषा करणारे सोबत नकोत, अशी ठाम भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे. गायकवाड यांनी काँग्रेसची विचारधारा समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित असून, कायदा हातात घेणाऱ्यांसोबत युती शक्य नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत वैचारिक मतभेद असले तरी, भाजपसारख्या शक्तीला रोखण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शरद पवार यांनीही आघाडीत लढण्याची भूमिका घेतल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले, ज्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT