THACKERAY BROTHERS ALLIANCE LIKELY MNS AND SHIV SENA (UBT) MAY JOIN HANDS Saam Tv
Video

ठरलं! मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार? महाविकास आघाडीचं काय होणार? VIDEO

Thackeray Brothers Political Reunion: मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युती अंतिम टप्प्यात असून ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडी आणि आगामी महापालिका निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी बातमी समोर येत आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युतीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधूंच्या या युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला सोडून थेट आपले भाऊ राज ठाकरे यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप, प्रचाराची दिशा आणि निवडणूक रणनीती यावर एकमत झाले असून मराठी महापौर बसवण्याच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू आग्रही असल्याचं समजतं. या युतीची अधिकृत घोषणा झाल्यास मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांच्या राजकारणात मोठा उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांचे लक्ष ठाकरे बंधूंच्या निर्णयाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: लँडिंगदरम्यान विमान कोसळलं, ७ जणांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Municipal Elections : निवडणुका लागताच महायुतीत मिठाचा खडा, अजित पवार स्वबळावर लढणार, ठाण्यात रंगत वाढली

Bigg Boss Marathi 6 : अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं 'बिग बॉस मराठी'शी खास नातं, कोकण हार्टेड गर्लनं VIDEO शेअर करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT