raigad politics minister bharat gogawale gets government flag hoisting honour saam tv
Video

रायगडमध्ये शासकीय ध्वज वंदनाचा मान मंत्री भरत गोगावलेंना, VIDEO

bharat gogawale raigad republic day flag honour : रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकीय ध्वज वंदनाचा मान यावर्षी मंत्री भरत गोगावले यांना मिळाला आहे. त्यामुळं गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Nandkumar Joshi

रायगडचे पालकमंत्रिपद स्थगित झाल्यापासून रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकीय ध्वजवंदनावरून शिंदेसेना- राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. गेल्यावर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना रायगडच्या मुख्यालयाचे ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला होता. त्यामुळं नाराजी व्यक्त करीत मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांचा निर्णय मान्य केला केला होता. आता यावर्षी प्रजासत्ताक दिनी कोणाला मान मिळणार यावरून चर्चा सुरू असताना मंत्रालयाच्या सामान्य प्रशासनाने परिपत्रक काढत यादी जाहीर केली आहे. यामध्ये रायगडच्या ध्वजवंदनाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आला आहे. यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रम्पनं ब्रिटनला फटकारलं? 'दिएगो गार्सिया' बेटावर अमेरिकेचा दावा

मुंब्र्याचा रंग हिरवा करणार, MIM नगरसेविकेचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप-शिंदेसेनेत संघर्ष पेटला? सरवणकरांचा आरोप, व्हॉटसअ‍ॅप मेसेजमुळे पराभव

ठरलं! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महौपार; मुंबईचं काय?

असहाय्य महिलांना ती वेश्याव्यवसायात ढकलायची; टीप मिळाली, हॉटेलवर धाड टाकली; आतील दृश्य बघून सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT