Flag Hoisting Clash in Raigad Saam Tv
Video

Raigad News: रायगडमध्ये नेमका मान कुणाला? एकाचवेळी तटकरे आणि गोगावलेंकडून झेंडावंदन

Flag Hoisting Clash in Raigad: रायगडला अद्याप पालकमंत्री मिळाले नाहीत. पण आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी करण्यात आलेल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात वेगळंच चित्र पाहायला मिळाले. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांनी वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन केले.

Priya More

आज महाराष्ट्र दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलिबागमध्ये पोलिस परेड मैदान येथे तर मंत्री भरत गोगावले यांनी महाडच्या चांदे क्रिडांगण येथे झेंडा वंदन केले. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या वाद सुरू आहे. रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये आदिती तटकरे यांना झेंडा वंदनाचा मान दिल्याने नवा वाद निर्माण झाला होता. त्यावर मार्ग म्हणून महाडच्या चांदे क्रिडांगण येथे होणाऱ्या शासकिय झेंडा वंदनाचा मान भरत गोगावले यांना देऊन महायुतीत सुरु असलेल्या वादावर तात्पुरता उपाय करण्यात आला आहे.

अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयात मुख्‍यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्‍णालय मदत कक्ष स्‍थापन करण्‍यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. आदिती तटकरे यांनी या कक्षातून चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली. गरजू रूग्‍णांना वैद्यकीय सेवा उपलब्‍ध होण्‍यासाठी आवश्‍यक ते सहकार्य या कक्षातून केले जाणार आहे.

तर दुसरीकडे, 'अंगणवाडी सेविकांचे मानधन रखडलेले नाही. दरमहिना त्यांना वेळच्यावेळी मानधन अदा केले जाते. राज्याचा नवीन अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडला गेल्यानंतर एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करताना काही दिवसांचा विलंब होत असतो. हा विलंब सर्वच विभागात असतो. अंगणवाडी सेविकांना वेळेत त्यांचे मानधन कसे मिळेल यावर आमचे लक्ष असते.' असं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

SCROLL FOR NEXT