Raigad Rain Saam TV
Video

Raigad : रायगडमध्ये मुसळधार पाऊस; शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Red Alert : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महाड, पोलादपूर, माणगाव, मसळा येथील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, काही ठिकाणी पूरसदृश परिस्थितीही निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. आपत्कालीन सेवांना सतर्क ठेवण्यात आलं असून, जिल्ह्यातील निचांकी भागांमध्ये विशेष लक्ष दिलं जात आहे. हवामान विभागानुसार, पुढील २४ ते ४८ तासांत रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचं आणि अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : सोज्वळ साज अन् निखळ हास्य, शिवाली परबचे पाहा लेटेस्ट PHOTOS

Pitru Paksha: पितृपक्षात 'या' ३ गोष्टी घरी आणू नका, अन्यथा घरात होऊ शकतात अडचणी

Maharashtra Live News Update: धुळ्यात भयंकर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर

शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यास दिसतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT