Raigad politics Aditi Tatkare vs Bharat Gogawale  saam tv
Video

Maharashtra Politics : अधिवेशन सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी डील?

Aditi Tatkare vs Bharat Gogawale : मुंबईत विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मुंबईपासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठी घडामोड घडली आहे.

Saam Tv

सूरज मसूरकर, साम प्रतिनिधी | मुंबई

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आता लवकरच सुटणार आहे. पालकमंत्रिपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं. महायुतीत वाद होत असताना त्यावर तोडगा काढला आहे. अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं साम टीव्हीला सूत्रांकडून समजतं.

नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजीनाट्य रंगलं होतं. नाशिकचा तिढा जवळपास सुटला आहे. मात्र, पालकमंत्रिपदावरून रायगड जिल्ह्याला दिलेला राजकीय वेढा कायम होता. पण आता त्यावरही मार्ग काढला आहे. अडीच-अडीच वर्षे पालकमंत्रिपद दिलं जाणार आहे. अडीच वर्षे आदिती तटकरे यांच्याकडे, तर अडीच वर्षे भरत गोगावले यांना दिले जाण्याची शक्यता आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तटकरे यांना, तर नंतरची अडीच वर्षे ही गोगावलेंना दिली जाऊ शकतात. लवकरच यासंदर्भात एक बैठक होऊ शकते. त्यात अडीच वर्षांचा फॉर्म्युल्यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT