Rahul Gandhi Heads To Rajghat With 300 Mps As Opposition Protest Intensifies 
Video

राहुल गांधी ३०० खासदारांना सोबत घेऊन राजघाटाकडे रवाना; सरकारविरोधात विरोधकांचा एल्गार

Rahul Gandhi’s Rajghat March: निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांचं आंदोलन आणखी तीव्र झालंय. मल्लिकार्जुन खरगे यांच्या लंच डिप्लोमसीनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि खरगे विरोधी खासदारांसोबत राजघाटाकडे रवाना झालेत.

Bharat Jadhav

गेल्या दोन दिवसापासून देशाची राजधानी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घोषणाबाजीनं दुमदुमलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र झालंय. विरोधी पक्षातील खासदारांच्या एल्गारामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढतोय. दरम्यान आज पुन्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधीपक्षातील खासदारांना जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यांच्या या लंच डिप्लोमसीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे खासदारांसोबत राजघाटाकडे रवाना झाले.

त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर जोरदार टीका केली. आमच्यासोबत राज्यसभा आणि लोकसभेतील सुमारे ३०० खासदार आहेत. आम्हाला शांततापूर्ण आंदोलन करायचे आहे. गेल्या दोन दिवसांपासून आम्हाला आंदोलन करण्यापासून रोखलं जातंय. पहिल्या दिवशी आम्हाला निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर अडवण्यात आले. त्यानंतर, आम्ही जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याची इच्छा व्यक्त केली; मात्र काल, तुम्ही पाहिल्याप्रमाणे, आम्हाला तिथेही अडवण्यात आले आणि आमच्या लोकांवर हल्ले करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला. नरेंद्र मोदी, अमित शाह, ज्ञानेश कुमार आणि मोहन भागवत यांनी संविधान नष्ट केलंय. त्यांनी गुन्हेगारी कट आखत सत्तेवर ताबा मिळवलाय. त्यांनी संविधान नष्ट केलं, मते चोरली, यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. कायद्याच्या कचाट्यात आणलं जाईल त्यांना शिक्षा दिली जाईल, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

महायुतीत बिघाडी! माजी मंत्री अन् राष्ट्रवादीच्या आमदारात जुंपली; आरोप-प्रत्यारोपानं मवाळमधील राजकारण तापलं

Maharashtra News Live Update: सांगलीत कार विहिरीत कोसळून एकाचा मृत्यू; दोन दिवसांनी मृतदेह सापडला

Skin Care: ओपन पोर्स कमी करुन चेहरा होईल नॅचरल ग्लोईंग, फक्त रात्री झोपताना ५ मिनिटांत लावा हा होममेड जेल

50 प्रभागांमधील निवडणुका रद्द! 6 महिन्यात पुन्हा निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश; कारण काय?

Business Ideas For Women: महिलांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी, हे १० बिझनेस जे तुम्ही घरातून करू शकता

SCROLL FOR NEXT