Rahul Gandhi fines Rs 200 saam tv
Video

Rahul Gandhi Fine : राहुल गांधींना 200 रुपयांच्या दंडाची शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?

Court Slaps ₹200 Fine on Rahul Gandhi : राहुल गांधी यांना लखनऊ कोर्टानं २०० रुपयांचा दंड केला. हे नेमकं प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून...

Nandkumar Joshi

काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे लखनऊ न्यायालयात बुधवारी पुन्हा अनुपस्थित राहिले. त्यामुळे न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना २०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळं समाजात वैमनस्य आणि द्वेष पसरत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर लखनऊ न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी या सुनावणीला सातत्याने अनुपस्थित राहत असल्यानं न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांना २०० रुपयांचा दंड केला. तसेच पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी समजही दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT