Rahul Gandhi Takes Oath As A MP in Lok sabha SAAM TV
Video

VIDEO : संविधान दाखवून राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ; विरोधकांनीही दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

Rahul Gandhi Oath taking Video : राहुल गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी हातात संविधानाची प्रत घेतली होती.

Nandkumar Joshi

प्रमोद जगताप, नवी दिल्ली | साम टीव्ही

काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार राहुल गांधी यांनी नव्या संसदेतील लोकसभेच्या दालनात खासदारकीची शपथ घेतली. राहुल गांधी शपथ घेण्यासाठी जात असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. राहुल गांधी शपथ घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी हातात संविधान घेत उपस्थित खासदारांना दाखवलं. त्यांच्या या कृतीनंतर के. सी. वेणुगोपाल, अखिलेश यादव आदींनी उभं राहून बाकं वाजवली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी वायनाड मतदारसंघाची खासदारकी सोडली. त्याठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. त्या ठिकाणी इंडिया आघाडीकडून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्लास्टिकच्या की काचेच्या, कोणत्या बाटलीमध्ये तेल ठेवावे?

"बेडवर तो तर..."  रोहित शर्माबाबत अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, 'त्या' बेडरूम सीक्रेटनं उडाली खळबळ, व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: चौफुला-सुपे रस्त्यावर एसटी बसचा भीषण अपघात

Accident News : बारामतीत भीषण अपघात! शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बस घाटात उलटली

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात मोठा बदल

SCROLL FOR NEXT