Onion Scam VIDEO: एक लाख टन कांदा खरेदी संशयाच्या गर्तेत Saam TV
Video

Onion Scam VIDEO: एक लाख टन कांदा खरेदी संशयाच्या गर्तेत

Onion News: नाशिकमध्ये कांदा खरेदीचा मोठा घोटाळा, सामटीव्हीकडून घोटाळ्याचा पर्दाफाश.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकमध्ये कांदा खरेदीचा महाघोटाळा समोर आला आहे. महासंघाकडून (एनसीसीएफ) करण्यात येत असलेली कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अवघ्या दोन दिवसांत सुमारे १ लाख टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांना सप्ताहात खरेदीस एकूण १२०० टनांचीच मर्यादा असताना एवढी मोठी खरेदी कशी केली ? तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पोर्टल का बंद होते ? एवढ्या मोठ्या खरेदीने बाजार दरात सुधारणा न होता, त्यानंतर भाव काही अंशी कमी का झाले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अधिकारी काही ठरावीक व्यापारी आणि काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे एक रॅकेट तयार झाले असून, मागील काही वर्षांपासून झालेल्या हजारो कोटींचा घोटाळ्याचीही ईडी- सीबीआयकडून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. साम टीव्ही कडून घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT