Pune Water Issue Saam Tv
Video

Pune Water Crisis: पुण्यात मंगळवारी पाणी नाही, कोणकोणत्या भागांना बसणार फटका

Pune Water Issue: पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी येणार नाही. पाईप लाईन दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

Priya More

पुणे शहरातील काही भागात मंगळवारी म्हणजे उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. खडकवासला ते वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जोडणाऱ्या रॉ वॉटर लाईन सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे फुटल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ही गळती थांबवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मंगळवारी दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याने शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.

वारजे, शिवणे औद्याोगिक परिसर, कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, भोसलेनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड आणि खडकीचा काही भाग येथील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. दुरुस्ती कालावधीमध्ये टँकरने केला जाणारा पाणी पुरवठा देणे शक्य होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या मंगळवारी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT