Pune Crime : स्वारगेट बस स्टँडमध्ये महिलेवर शिवशाहीत बलात्कार, पुण्यात संतापाची लाट 
Video

Pune Crime : स्वारगेट बस स्टँडमध्ये शिवशाहीत महिलेवर बलात्कार, पुण्यात संतापाची लाट

Swargate Pune Crime Update : स्वरागेट बस स्टँडमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर तेथून पळ काढला.

Namdeo Kumbhar

Pune Crime News Update : बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरले आहे. पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्टँडवर शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली आहे. २६ वर्षीय महिलेला एकटं पाहून अज्ञात व्यक्तेनं बलात्कार केला अन् त्यानंतर पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पुण्याहून फलटणला निघाली होती. त्यावेळी शिवशाही बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग झाला आहे. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

स्वरागेट बस स्टँडमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर तेथून पळ काढला. आज पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुण्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली. पुण्यातील महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मी पोलीस आयुक्तांची यासंदर्भात बोललो आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

Maharashtra Live News Update: निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यासंदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

SCROLL FOR NEXT