Pune Unseasonal Rain Saam tv
Video

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Pune Unseasonal Rain: पुण्याला अवकाळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशी झोडपून काढले. पुण्यातील मध्य आणि पूर्व भागात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

Priya More

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने पुण्याला अक्षरश: झोडपून काढले. पुण्यात दुपारी ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे शहरातील पूर्व आणि मध्यवर्ती भागात पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यातील चंदननगर, खराडी, नारायण पेठ, शनिवार पेठ, कोथरूड, सिंहगड रोड या भागात पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी साचले होते. या पावसामुळे पुणेकरांना छत्र आणि जॅकेट घेऊन बाहेर पडावे लागत आहे. थोडा वेळ जरी पाऊस झाला असला तरी या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT