BJP Congress clash in Pune latest updates Saam TV
Video

Pune Rada : पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार राडा, आंदोलनावेळी दगडफेक | Video

Pune Clash Between BJP and Congress Turns Violent : पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस भवनाबाहेर आंदोलनावेळी दगडफेक झाली. काही कार्यकर्ते जखमी झाले असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

Namdeo Kumbhar

BJP Congress clash in Pune latest updates : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुण्यात भाजपचे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस भवन बाहेर भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे पुण्यात काँग्रेस भवनासमोर जोरदार राडा झाला. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या दगडफेकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मागील तीन ते चार तासांपासून भाजपकडून आंदोलन सुरू होते. काँग्रेसभवन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. दुसरीकडे काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. या आंदोलनावेळी दगडफेक करण्यात आली असून यात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. कारच्या काचाही तुटल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Face Wash : एकही पैसा खर्च न करता घरीच बनवा फेसवॉश, तुमचा चेहरा आरशासारखा चमकेल

Kolhapur : २५ जणांच्या टोळक्यानं JCB घरावर फिरवला, दिवसाढवळ्या १३ तोळे सोन्यावर डल्ला, कोल्हापूर हादरले

Viral Video: पहिल्यांदा Kiss, मग Ice Cream! मुलगी आणि हत्तीच्या पिल्लाच्या क्युट बॉन्डचा व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजप-काँग्रेस आमनेसामने, आंदोलनादरम्यान दगडफेक

Calcium Food: शरिरात कॅल्शियमची कमतरता आहे? मग डेयरी प्रॉडक्टशिवाय 'हे' पदार्थ देखील नक्की खा

SCROLL FOR NEXT