Pune Accident News Saam TV News
Video

Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपी मुलानं पोलिसांच्या चौकशीदरम्यान एकाही प्रश्नाचं उत्तर न दिल्याची सूत्रांची माहिती

Pune Accident News: अल्पवयीन मुलाची पोलिसांकडून चौकशी, चौकशीदरम्यान एकाही प्रश्नाला उत्तर देण्यास आरोपी मुलाचा नकार, पोलिसांची आव्हानं वाढली

Saam TV News

पुणे : पुणे अल्पवयीन मुलाच्या आरोपी मुलानं कोणतीही उत्तरं दिली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहेत. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. आरोपी मुलाच्या आईच्या समोरच ही चौकशी करण्यात आली. बाल सुधारगृहामध्ये करण्यात आलेल्या या चौकशीदरम्यान आरोपी मुलानं पोलिसांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीतील आव्हानं आणखी वाढली आहे. आरोपी मुलाची आई शिवानी अग्रवालला आज पोलिसांनी सकाळी अटक केली होती. आरोपी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. फेरफार केलेलं रक्त आरोपी मुलाच्या आईचंच असल्याचं पोलिसांच्या चौकशीतून समोर आल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर आता मुलाच्या चौकशीदरम्यान, आरोपी मुलानं एकाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही, असं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khana Saree Contrast Blouse: लग्नात खणाच्या साडीवर घाला ८ कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज; बजेटमध्ये करा स्टायलिश लूक

Share Market Closed: पुढच्या आठवड्यात फक्त ३ दिवस सुरु राहणार शेअर मार्केट;४ दिवस सुट्ट्या, कारण काय?

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? नेमकं सत्य काय?

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा

Kolhapur : कोल्हापुरात गर्भलिंग निदानाचे रॅकेट उघड; संभाजी शिंदेसह ६ जणांना बेड्या, डॉक्टरचाही समावेश

SCROLL FOR NEXT