Pune Land Scam Pune Land Scam Government Cheated of ₹6 Crore Stamp Duty, Parth Pawar Controversy Deepens
Video

Pune Land Scam : पुणे जमीन घोटाळा, पार्थ पवारांचे नाव वगळले?

Pune Land Scam : पुण्यातील ४० एकर जमीन घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याने वाद निर्माण झाला आहे.

Namdeo Kumbhar

Pune land scam FIR details and Parth Pawar’s role : पुण्यातील गाजलेल्या चाळीस एकर जमीन घोटाळ्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये शीतल तेजवानी, अमेडिया एंटरप्राइजेसचे दिग्विजय पाटील आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांचा समावेश आहे. मात्र, या प्रकरणात चर्चेत असलेले पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वृत्तानुसार, 'जे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यात मात्र पार्थ पवारांचा कुठेही संबंध नसल्याचं प्राथमिक आपल्याला दिसतंय'. बावधन पोलीस स्टेशनमध्ये सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क चुकवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांची नेमकी भूमिका काय होती आणि एफआयआरमधून त्यांचे नाव का वगळण्यात आले, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

SCROLL FOR NEXT