Pune Police at the site where Koyta Gang vandalized shops and vehicles following a firing incident.  Saam tv
Video

Pune News: पुण्यात कोयता गँगचा उच्छाद, बाईकवरुन उतरताच दुकानं फोडली; पाहा VIDEO

Pune Sadesatranali Area Gang Vandalism Incident: पुण्यात साडेसतरानळी परिसरात कोयता गँगने दुकानं आणि वाहनांची तोडफोड करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Omkar Sonawane

पुणे: येथील साडेसतरानळी परिसरात पाच-सहा जणांच्या टोळक्याने काही दुकानांसह विविध वाहनांची कोयत्याने तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी त्यातील तिघाजणांना ताब्यात घेतले असून इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

येथील पालिकेच्या शाळा परिसरात सुरूवातीला या तरूणांनी दुकानांमध्ये शिरून तेथील साहित्याची तसेच, रस्त्यावरील वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. त्यानंतर हे टोळके पाईपलाईन चौकातील एका मिठाईच्या दुकानात शिरून त्यांनी तेथील मिठाईचे काचेचे कपाट, फ्रीज व इतर साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर ते मुंढवा रस्त्याजवळील संदीप हॉटेल परिसरात गेले व तेथेही काही वाहनांची तोडफोड केली. या टोळक्याने नशा केलेली असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, पोलिस उपायुक्त अनुराधा उदमले व पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. पोलिसांच्या पथकाने टोळक्यातील तीन जणांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT