pune news  saam tv
Video

Pune Rain: पुण्यात पावसाचे थैमान, उच्चभ्रू सोसायाट्यांमध्ये गटारीचे पाणी शिरले, नागरिकांचा महापालिकेवर संताप|VIDEO

Overflowing Drains in Kothrud: पुणे येथील कोथरूड परिसरात असलेल्या उच्चभ्रू सोसायाट्यांमध्ये थेट गटारीचे पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांनी पुणे महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा मोठा फटका कोथरूडमधील उच्चभ्रू सोसायट्यांना बसला असून ३ ते ४ सोसायट्यांच्या परिसरात थेट गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या भागातील गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरले आहे. काही ठिकाणी तर पाणी कंबरेपर्यंत साचले असून त्यामुळे रहिवाशांना घरात प्रवेश करणेही कठीण झाले आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली असून अद्याप कोणतीही तातडीची कारवाई झालेली नाही. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT