hinjewadi tempo traveller  Saam Tv
Video

Pune Bus Fire : पुणे हिंजवडी जळीतकांड प्रकरणाला वेगळं वळण, मी तर चालकाला..; कंपनी मालकाचा मोठा खुलासा

Hinjewadi Bus Fire: पुणे हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर जळीत कांडाला आता एक धक्कादायक वळण लागले आहे.

Omkar Sonawane

पुणे कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि हिंजवडी पोलिसांनी आज सकाळी 11 वाजता व्योमा ग्राफिक्स कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली असता व्योमा ग्राफिक्स कंपनीचा ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकर याला कंपनीकडून दिवाळीत कमी पैसे मिळाल्याने तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने, त्याने तो चालवत असलेली टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस बेंजामिन केमिकल च्या साह्याने पेटवून आपल्या कंपनीतील चार जणांचा बळी घेतला असं पोलीस तपासात उघडकीस आले होते. मात्र या प्रकरणाला आता वेगळच वळण लागण्याची शक्यता आहे.कारण कंपनीच्या मालकाने थकीत पगारच्या दाव्याला नकार दिला आहे.कंपनीच्या मालकांनी चालकाचा कोणताही पगार थकवला नसल्याचा खुलासा केला आहे.नितेश शाह असे या मालकाचे नाव आहे. ते म्हणाले, आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरलेलो नाही. तसेच त्या कामगाराचा आम्ही कुठलाही पगार थकवला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.या दाव्या प्रतिदाव्यामुळे या प्रकरणाला आणखी नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

SCROLL FOR NEXT