पुण्यात भाजप खासदार मेघा कुलकर्णी यांच्याविरोधात वादग्रस्त फ्लेक्स लावल्याने वाद पेटलाय. डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे saam tv
Video

Pune News: मेधा कुलकर्णीं विरोधात फ्लेक्सबाजी भोवली! मस्तानी पेठ नावावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल|VIDEO

Flex controversy in Pune: पुण्यात भाजप खासदार मेघा कुलकर्णी यांच्याविरोधात वादग्रस्त फ्लेक्स लावल्याने वाद पेटलाय. डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

Omkar Sonawane

पुणे: शहरात पुन्हा एकदा फ्लेक्सबाजीचा वाद पेटलाय. भाजपच्या खासदार मेघा कुलकर्णी यांच्या विरोधात वादग्रस्त मजकूर असलेले फ्लेक्स लावण्यात आल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश प्रधान या व्यक्तीने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, बालगंधर्व चौक परिसरात "कोथरूडच्या बाई तुम्हाला एवढीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा" अशा आशयाचा फ्लेक्स झळकवण्यात आला होता. या फ्लेक्सवर गिरीश गायकवाड, अतुल दिघे आणि विलास सोनवणे ही नावे छापण्यात आली होती.

सदर फ्लेक्सबाजी प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम ३ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244 आणि 45 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या फ्लेक्सबाजीमागील आरोपींचा शोध घेण्यात येतोय. या घटनेमुळे पुणेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : मिनी मंत्रालयाचा फैसला आज; १२ जिल्ह्यांत कुणाचा गुलाल उधळणार?

Accident : भंडारा खाऊन घरी निघाल्या, वाटेतच ८ जणींना कारने चिरडले, ४ जणांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

Shocking News: कारमध्ये आढळले १ महिला अन् २ पुरूषांचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? दिल्लीत खळबळ

Maharashtra Live News Update: पुसदमध्ये उभ्या ट्रॅव्हल्सला भीषण आग

Paneer Ghotala Recipe : सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी बनवा पनीर घोटाळा, पोषण मिळेल अन् वेळही वाचेल

SCROLL FOR NEXT