सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणे: देशभरात सायबर फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नवीन क्लूप्ती लढवून हे सायबर भामटे सामान्यांना गंडा घालत असतात. सर्वसाधारणपणे हे भामटे परराज्यातले किंवा परदेशातील असतात. मात्र पुण्यातील एका अशाच सायबर चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यामध्ये एका राजकीय पक्षाशी निगडित असणारा भामटा पुणे पोलिसांनी जेरबंद केला आहे.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (२८, रा. कोकबन, ता. रोहा, जि.. रायगड) असे या सायबर भामट्याचे नाव आहे. मनी लॉड्रिग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची याने सहा कोटी २९ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या वाजंत्रीने फक्त हा एकच नाही तर डिजिटल अटकेची भीती दाखवून पाच जणांची फसवणूक केल्याच तपासात निष्पत्र झाले आहे. आरोपी बांधकाम व्यवसायिक आहे. इतकंच नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या जवळचा खास माणूस आहे. त्याची पत्नी राष्ट्रवादीची कार्यकता असून ती गावची सरपंच देखील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.