Pune Pimpari Chinchwad News Saam Tv
Video

Pune : पुण्यातील संतापजनक घटना; बस स्टँडवर तरूणीसमोर हस्तमैथून, पोलिसांनी ४८ तासांत नराधमाच्या मुसक्या आवळल्या

Pimpri Chinchwad latest crime news : पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 48 तासांत अटक केली. सीसीटीव्ही फुटेजमधील शूज आणि टी-शर्टच्या रंगाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

पिंपरी-चिंचवड शहरातील सेंट मदर तेरेसा उड्डाणपुलावर तरुणीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या माथेफिरू तरुणाला पिंपरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तरुणीसमोर अश्लील कृत्य केल्यानंतर स्वतःची ओळख लपवण्यासाठी या माथेफिरू तरुणाने आपले कपडे बदलले होते. या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास केला. पोलिसांनी परिसरातील जवळपास ६० ते ७० सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. अखेर आरोपीच्या शूज आणि टी-शर्टच्या रंगावरून त्याचा माग काढत पोलिसांनी त्याला वाल्हेकरवाडी येथील चिंचवडेनगर येथून ताब्यात घेतले.

झाकीर शेख (वय ४३ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा एका मॉलमध्ये बाऊन्सर म्हणून काम करत असून, त्यानेच हे लज्जास्पद कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कायदेशीर कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT