Pune crane company shifting to Gujarat  Saam Tv
Video

Pune News : पुण्यातील आणखी एक कंपनी गुजरातला जाणार, किती कामगार बेरोजगार होणार? पाहा VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई : पुण्यामधून आणखी एक कंपनी गुजरातला स्थलांतरित होत असल्याचं समोर आलंय. खराब रस्त्यांमुळे कंपनी स्थलांतरित होत असल्याचं समोर आलंय. मुळशी तालुक्यातील धनवेवाडीची क्रेन कंपनी रस्ता नसल्याच्या कारणास्तव प्रकल्प बंद करून गुजरातला स्थलांतरित होत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. या कंपनीमधील चारशे कामगारांवर बेरोजगाराची परिस्थिती निर्माण होणार आहे.

पुणे पौड दरम्यान धनवेवाडी रस्त्यावर युनायटेड क्रेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ती बारा वर्षे या ठिकाणी आहे. मात्र, सध्या या ठिकाणी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झालीय. कंपनीत अवजड अशी क्रेन बनवली जातात, त्यामुळे रस्त्यावरून कंपनीत मोटर ट्रक किंवा कंटेनर येऊ शकत नाही. स्थानिकांनी मागणी करून देखील प्रशासनाने दखल घेतलेली नाही. या ठिकाणी रस्ता व्यवस्थित होत नाही. या कंपनीमध्ये स्थानिक कामगार आहेत. प्रशासनाकडून रस्ता होत नसल्याचे कारण देत कंपनी बंद करून गुजरातला स्थलांतरित करण्याच्या हालचाली कंपनीने सुरू केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : धारावीतील आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी केली तिघांना अटक

Fenugreek Seeds: मेथीचे दाणे आरोग्यासाठी रामबाण; जाणून घ्या फायदे...

Assembly Election: नांदगावची जनता कोणासोबत नांदणार? काय आहे मतदारसंघाची स्थिती, कसं असणार विधानसभेचं मैदान?

Maharashtra Politics : मी बोलायचं म्हटलं तर पळता भुई थोडी होईल; गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा जुंपली

Low Budget Kedarnath Trip : कमी पैशांत 'केदारनाथ यात्रा' कशी कराल? फॉलो करा हा प्लान

SCROLL FOR NEXT