Scene from Jadhavwadi where a massive crane collapsed on a car, leaving two injured Pimpri Chinchwad Pune Saam Tv
Video

भीषण अपघात! वाहनावर क्रेन कोसळली अन्...; पिंपरी चिंचवडमधील व्हिडिओ व्हायरल

Crane Collapses On Car: पिंपरी चिंचवडमधील जाधववाडीत मालवाहतूक करणारी क्रेन एका चारचाकी वाहनावर कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

Omkar Sonawane

पुणे: पिंपरी चिंचवडमधील जाधववाडी परिसरात आज एक धक्कादायक अपघात घडला. माल वाहतूक करणारी एक मोठी क्रेन रस्त्यावरून जात असलेल्या चारचाकी वाहनावर अचानक कोसळली. ही घटना क्रेनचा फ्रेंच तोल बिघडल्यानं घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाचा मोठा भाग चुरडून गेला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीत असलेले दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीवर उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रस्त्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah : भारतीय संघाला मोठा धक्का? आशिया कपमधून जसप्रीत बुमराह बाहेर?

Maharashtra Live News Update : सायना नेहवालने घटस्फोटातून घेतली माघार

Mahadevi Elephant: महादेवीनं चिमुकल्याला वाचवलं? महादेवी हत्तीणीचा व्हिडिओ व्हायरल?

Mumbai-Pune : मुंबई-पुणे फक्त दीड तासात, काय आहे नवा प्लान| VIDEO

Mumbai local train Dispute : तिकीटावरून लोकलमध्ये वाद; रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड

SCROLL FOR NEXT