BJP leaders in Karad alleging bogus voting by former CM Prithviraj Chavan’s family Saam Tv
Video

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबावर दुहेरी-तिहेरी मतदानाचा भाजपकडून गंभीर आरोप|VIDEO

BJP Claims Ex-CM Prithviraj Chavan: माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबावर दुहेरी आणि तिहेरी मतदानाचा गंभीर आरोप झाला आहे.

Omkar Sonawane

पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबावर दुहेरी व तिहेरी मतदानाचा आरोप

भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला

इंद्रजीत चव्हाण व त्यांच्या कुटुंबाचे अनेक ठिकाणी मतदान असल्याचा दावा

आधीच्या निवडणुकीतही बोगस मतदान केल्याचा भाजपचा आरोप

कॉँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे मतदान तीन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक ठिकाणी मतदान आहे. पुतणे इंद्रजीत चव्हाण आणि त्यांच्या पत्नी, आई, मुलगा यांचे मतदार यादीत तीनवेळा नाव असल्याचे कराडमधील भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटल आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या परिवाराचेही तीन ठिकाणी मतदान आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी वय बदलून नाव नोंदणी केल्याचा आरोप कराडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कॉँग्रेसच्या बोगस मतदान संशोधन समितीचे अध्यक्ष आहेत. पण त्यांच्याच मतदारसंघात अशाप्रकारे घोळ करणे नैतिक नाही, याआधीच्या निवडणुकीत चव्हाण यांनी असा प्रकार करूनच यश मिळवले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' मधील अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं, फोटोंवरून नजर हटणार नाही

Nashik Guardian Minister: डोनाल्ड ट्रम्प सोडवणार नशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद; भुजबळ,भुसे की महाजन? कोणाला मिळेल संधी

Tuesday Horoscope:आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra weather : महाराष्ट्रात थंडी नेमकी कधी सुरू होईल? हवामानाचा अंदाज काय सांगतोय? जाणून घ्या

Latur News: शेत रस्त्याच्या वादावरून तिघांना जबर मारहाण.. कोयता, लाठ्याकाठ्यांनी हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT