Video

VIDEO: Ambegaon मधील प्रिस्टीन पॅसिफिक सोसायटीची जेसीबीच्या सहाय्याने पाडली भिंत, नेमकं प्रकरण काय?

Ambegaon News: वेताळनगर येथील रहिवाशांकडून सोसायटीधाराकांवर दगडफेक, जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली भिंत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: आंबेगाव येथील प्रिस्टीन पॅसिफिक सोसायटीच्या हद्दीत असणारी भिंत अज्ञातांकडून जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान सोसायटीतील सदस्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भिंत पाडणाऱ्या जेसीबीकडे धाव घेतली. जेसीबी चालकाने संबंधित ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर वेताळनगर येथील स्थानिकांनी सोसायटीधारकांवर दगडफेक केल्याने परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सोसायटीधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रिस्टीन पॅसिफिक सोसायटीच्या जागेवर गाव नकाशावर नोंद असलेला एक नैसर्गिक नाला होता. तो नैसर्गिक नाला बुजवून त्याठिकाणी अगरवाल बिल्डरने सोसायटी उभी केली असल्याचा दावा वेताळनगर येथील रहिवाशी करत आहेत.या नाल्याच्या जागेहून वेताळनगरला रहदारीसाठी रस्ता सद्यस्थित सोसायटीधारकांनी बंद केला असल्याचे मत वेताळनगरचे स्थानिक व्यक्त करत आहेत. तो रस्ता खुला करण्यात यावा यासाठी स्थानिकांनी उपोषण देखील केले होते. परंतु त्यावर पालिका प्रशासनाकडून तोडगा निघत नसल्याने त्यांनी हा मार्ग अवलंबिला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कल्याण पूर्व आणि डोंबिवलीत वीजपुरवठा खंडित

Modi Government : मोदी सरकार खात्यात टाकणार 34 हजार? केंद्र सरकारकडून मिळणार बोनस?

'माझं आता लग्न ठरलंय, रजा शिल्लक पाहिजे, तुम्ही पण...'; कोल्हापुरातील तरणाबांड पोलीस कर्मचाऱ्यानं पुण्यात आयुष्य संपवलं

Ayushman Card: आयुष्मान कार्ड वापरून तुम्हाला वर्षातून किती रुपयांचा मोफत उपचार मिळू शकतात?

Andheri Tourism: पावसाळ्यात लांब न जाता अंधेरीतील या हिरव्यागार ठिकाणी फिरून या; निसर्गाची मजा अनुभवायला मिळेल

SCROLL FOR NEXT