VIDEO: जिथे संकट असतं तिथे पंतप्रधान जात नाहीत Saam TV
Video

VIDEO: जिथे संकट असतं तिथे पंतप्रधान जात नाहीत, Sanjay Raut यांचा मोठा आरोप

Sanjay Raut News: जिकडे उत्सव आणि आनंद तिकडे पंतप्रधान जातात, संकटाच्या ठिकाणी जात नाहीत, परंतु त्यांना मणिपूर, हाथरस या ठिकाणी जायला वेळ नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. पंतप्रधान भारतीय क्रिकेट टीमला मिळू शकतात, जिकडे उत्सव आणि आनंद असतो तिकडे पंतप्रधान नेहमी जातात. जसं काही ट्रॉफी पंतप्रधानांनीच जिंकली आहे अशाप्रकारचं त्यांचं वागणं आहे. पण जिकडे संकट आहे तिथे पंतप्रधान जात नाहीत असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मणिपूर, हाथरस येथे लोक संकटात आहेत परंतु तिकडे पंतप्रधान कधी जात नाही. का जात नाही? माहित नाही असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे. भारतीय क्रिकेट टीमला भेटायला पंतप्रधान यांना वेळ आहे आणि भेटलंच पाहिजे, पण ज्या राज्यातून तुम्ही लोकसभेत निवडून आला आहात त्या राज्यात या देशातील सर्वात मोठी त्रासदी झाली आहे तिकडे तुम्ही जाऊ शकत नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

Archaeological discovery: इतिहासातलं मोठं रहस्य उघड; पुरातत्त्व विभागाला सापडली बायबलमध्ये नमूद केलेली ३,००० वर्षे जुनी वास्तू

Royal Enfield ने जाहीर केली नवीन Price लिस्ट; Meteor मॉडेल्ससह सर्व बाईकची नवीन किंमत, वाचा सविस्तर

Garba Makeup Tips : गरबा खेळताना मेकअप अजिबात उतरणार नाही करा 'या' ट्रिक्स फॉलो

Pawan Singh: कुटुंब अचानक सेटवर आले अन्...; पॉवरस्टार पवन सिंहने मध्येच सोडला 'राईज अँड फॉल' शो

SCROLL FOR NEXT