Rashtrapati Rajvat News SaamTv
Video

VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? मोठी अपडेट आली समोर

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असून येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Saam Tv

राज्यात 26 नोव्हेंबर पूर्वी नवीन सरकार स्थापन होणं आवश्यक आहे. मात्र कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कालावधी संपत आहे. त्यानंतर पुढच्या दोनच दिवसात नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे. मात्र या काळात महायुती किंवा महाविकास आघाडीने सरकार स्थापन न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागणार आहे. 2019 मध्ये ज्या प्रकारचं राजकीय नाट्य बघायला मिळालं होतं. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत देखील बघायला मिळते का, ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने आता राज्यात हालचाली सुरू झाल्या असून महायुती आणि मविआकडून तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. विमान, हेलिकॉप्टर, हॉटेल देखील राजकीय पक्षांकडून बुक करण्यात आलेले आहेत. आमदारांना कुठे ठेवायचं, बंडखोर, अपक्ष आमदारांना कशाप्रकारे आपल्या बाजूने करून घ्यायचं यासाठी आता रणनिती आखली जात आहे. त्यामुळे आता 26 नोव्हेंबर ही तारीख राज्याच्या राजकारणासाठी महत्वाची असणार आहे. या कालावधीत सरकार स्थापन करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा कस लागणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT