Prataprao Jadhav On Thackeray 
Video

Prataprao Jadhav On Thackeray: उद्धव ठाकरे दिल्लीला कशासाठी गेले होते? प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल

Prataprao Jadhav On Thackeray: ठाकरे गटाचे नाव बदलून टाकले पाहिजे. बांगला देशात हिंदू धर्मातील लोकांची होणाऱ्या कत्तलीवर उद्धव ठाकरे यांनी एक शब्दही उच्चारला नाहीये, अस म्हणत प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

Bharat Jadhav

दिल्लीवारीवरून राज्यातील नेते मंडळी एकमेकांवर टीका-टीप्पणी करत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केली की, राज्यातील विरोधी पक्ष त्यावर ताशोरे ओढत असते. आता उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सत्ताधारी पक्षाकडून टीका केली जातेय. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीवरून हल्लाबोल केला. ठाकरे दिल्लीला कशासाठी गेले होते? असा सवालच त्यांनी एका कार्यकर्मात केलाय.सतत केले जाणाऱ्या दिल्ली दौऱ्यामुळे ठाकरे गटाचे नाव बदलून आता काँग्रेस उबाठा गट असं नाव ठेवलं पाहिजे, असं प्रतापराव जाधव म्हणालेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा त्याग उद्धव ठाकरेंनी केलाय. बांगलादेशात हिंदू धर्माच्या लोकांची कत्तल केली जात आहे, त्यावर एकही शब्द उद्धव ठाकरेंनी उच्चारला नाहीये. त्याचठिकाणी आज बाळासाहेब असते तर त्यांचे भूमिका कशी राहिली असती. फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र आहेत म्हणून तुम्ही शिवसेना प्रमुख समजतात, परंतु त्यांचा एखादा गूण तरी त्यांनी आत्मसात केला हवा होता, असा टोला खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT