prakash ambedakr saam tv
Video

Prakash Ambedkar: मोदींच्या जागी मी असतो तर पुतिन यांची नीती मी वापरली असती- प्रकाश आंबेडकर|VIDEO

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जनतेला केंद्र सरकारला सांगावं लागतंय की काहीतरी कारवाई करा. अनेक हल्ले झाले, अनेकजण दगावले पण, दहशतवाद काही थांबत नाही. केवळ श्रद्धांजली पुरेशी नाही, केंद्र सरकारने प्रत्यक्ष कृती केली पाहिजे

Omkar Sonawane

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आणि दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या जागी मी असतो तर पुतिन यांची नीती वापरली असती. युक्रेन जर नोटाकडे गेला तर रशियाला धोका असल्याची मानसिकता त्यांची आहे. त्यामुळे त्यांनी युक्रेनच इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केल आहे. त्यांचा हेतु आहे की वाद थांबेल पण युद्ध थांबल्यानंतर युक्रेन पुन्हा नोटाकडे गेला तर धोका कायम आहे. आपल्याला पण अशीच नीती वापरली पाहिजे की पाकिस्तान पुढच्या 30 वर्षात मागे जाईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT