Prakash Ambedkar SaamTV
Video

Prakash Ambedkar : अमित शाह यांच्या विधानावर प्रकाश आंबेडकर यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले... |Marathi News

VBA Protest In Mumbai : प्रकाश आंबेडकर यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वंचितने सीएसएमटी स्टेशन बाहेर केलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते.

Saam Tv

अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर वंचितने आंदोलन केलं आहे. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकते उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी देखील या आंदोलनस्थळी दाखल होत अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान चांगल्या हेतूने केलेलं नाही. त्यामुळे देशात सगळीकडे आंदोलन केलं जात आहे. मुंबईत सुरू असलेल्या अंदोलनाचं प्रतिनिधित्व वंचित बहुजन आघाडी करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेच्या निर्मितीवेळी जनसंघाचा विरोध होता. आताही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे. यात नवीन काहीच नाही. त्यावेळी असलेले त्यांचे नियोजन अद्याप पूर्ण होऊ शकलेले नसल्याने त्यांचा जळफळाट होत आहे, अशी खोचक टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT