Rohit Arya, the man behind the Powai hostage drama, had earlier staged a protest against Minister Deepak Kesarkar in 2024. Saam Tv
Video

Rohit Arya:'शिक्षणमंत्र्यांनी' 2 कोटी थकवल्याचा आरोप; रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकर काय म्हणाले? VIDEO

Rohit Arya Deepak Kesarkar Protest 2024: मुंबईतील पवई येथे रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने तब्बल १७ मुलांना ओलीस ठेवल्याने खळबळ माजली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात आंदोलन करणारा हा तोच रोहित आर्या असून, त्याने दोन कोटी रुपयांच्या थकबाकीविरोधात हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळते.

Omkar Sonawane

...हा तोच रोहित आर्या आहे ज्याने ऑगस्ट २०२४ मध्ये देखील गोंधळ घातला होता. ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात रोहित आर्या ने उपोषण केलं होतं आणि त्यावेळी त्याला अचानक फिट आली होती. फिट आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझी शाळा, सुंदर शाळा या प्रकल्पाचे डिझाईन रोहित ने केल्याचा दावा त्याने त्यावेळी केला होता, मात्र त्यांची दखल घेतली नसल्याने त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सूरज लोखंडे आणि संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आणि "साम टिव्ही" चे कॅमेरामन सुमित भोसले यांनी त्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल केले होते.

मुंबईत रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवई भागात ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते.

मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने व्हिडिओ अपलोड सांगितलं. दरम्यान, एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे रोहितने संबंधित विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! शेत-रस्त्यांच्या आदेशाची ७ दिवसांत होणार अंमलबजावणी; सरकारचा मोठा निर्णय

AI Eduaction: केंद्राचा मोठा निर्णय! आता तिसरीपासूनच AI शिकवलं जाणार; १ कोटी शिक्षकांना देणार प्रशिक्षण

Fish Price Hike : खवय्यांच्या ताटातून मासे गायब होणार, सुरमई -पापलेटसह इतर मासळीचे दर गगनाला | VIDEO

Amitabh Bachchan : सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री? 'त्या' फोटोनं चर्चेला उधाण

'शुटिंग करायचं सांगून खोलीत नेलं अन्..' १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितनं नेमकं काय केलं? कोल्हापूरच्या आजीबाईंनी सांगितला थरार

SCROLL FOR NEXT