Powai Rain Saam TV
Video

Powai Rain : पवईत मुसळधार पाऊस, चाळींमध्ये शिरलं पाणी | VIDEO

Mumbai Rain : मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पवईला सुद्धा बसला आहे. चैतन्य नगर नेव्हल कंपाऊंड येथील बॉम्बे पब्लिक शाळा परिसर आणि आसपासच्या चाळीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका पवई परिसराला बसला आहे. विशेषतः चैतन्य नगर नेव्हल कंपाऊंड आणि बॉम्बे पब्लिक शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील अनेक चाळींमध्येही पाणी शिरल्याने रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मुंबईच्या सगळ्याच भागात पाणी साचले आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नागरिकांना अनेक समस्या उद्भवता आहेत.पवईमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रस्ते जलमय झाल्याने वाहनांची व पादचारींची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत. पुढील काही तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने नागरिकांनी घरातच थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT